सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दारूचा अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:17 IST2021-05-29T04:17:05+5:302021-05-29T04:17:05+5:30
मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांच्यासह उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. कोरोना महामारीच्या ...

सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दारूचा अभिषेक
मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांच्यासह उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला. कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारने लॉकडाऊन जाहीर केले असताना सर्व व्यापार ठप्प करण्यात आले. बाजारपेठ, दुकाने बंद करण्यात आले. मात्र, सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले. कपड्याचे दुकान, किराणा, मोबाइलचे दुकान, ऑटोमोबाइल, भाजी मार्केट या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार आज दोन ते तीन महिने झाले, त्यांना पगार नाही. त्यांना कोणतीही शासनाची मदत नाही. किराणामाल चोरून विकायचे व दारू खुलेआम विक्री करायची. सर्वसामान्य दुकानदाराची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा चालू करण्याचे आदेश दिलेले आहे. शहरांमध्ये १० हजार रिक्षावाले आहे, त्यांना फक्त ५०० रिक्षावाल्यांना सरकारने मदत केलेली आहे व बँक फायनान्स कंपनी यांच्या हप्ते भरायलासुद्धा यांच्याकडे पैसे राहिलेले नाही. बाजारपेठ लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला.
२८ मनसे आंदोलन