शेतकरी बंदच्या समर्थनार्थ अण्णांचे लाक्षणिक उपोषण
By | Updated: December 9, 2020 04:15 IST2020-12-09T04:15:56+5:302020-12-09T04:15:56+5:30
पारनेर (जि. अहमदनगर) : दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी ...

शेतकरी बंदच्या समर्थनार्थ अण्णांचे लाक्षणिक उपोषण
पारनेर (जि. अहमदनगर) : दिल्लीतील शेतकरी आंदोलन आणि भारत बंदला पाठिंबा देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.
हजारे यांनी मंगळवारी सकाळी संत यादव बाबा मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले. यानंतर पद्मावती मंदिरात जाऊन महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव द्यायला पाहिजे, अशी मागणी मोदी सरकारने गेल्या वेळेस मान्य केली. २३ मार्च २०१८ ला लिखित आश्वासन दिले; पण त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही, याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. अण्णांनी या मागणीसाठी वेळोवेळी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे.
...
...तर मी पुन्हा आंदोलन करीन
देशभरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे. सरकारचं नाक दाबल्यानंतरच तोंड उघडतं. त्यासाठी तशी स्थिती निर्माण केली तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातील. कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता दिली नाही आणि स्वामिनाथन आयोगानुसार पिकांच्या उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जादा भाव शेतकऱ्यांना न दिल्यास मी पुन्हा एकदा आंदोलन करीन, असे अण्णांनी सांगितले.
..
०८अण्णा हजारे उपोषण