अण्णांच्या सूचना केंद्रापर्यंत पोहोचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:19 IST2021-01-17T04:19:12+5:302021-01-17T04:19:12+5:30
कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांसंदर्भात समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या ...

अण्णांच्या सूचना केंद्रापर्यंत पोहोचविणार
कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांसंदर्भात समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार विखे यांनी हजारे यांच्याशी शनिवारी (दि१६) चर्चा केली. चर्चेमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, प्रश्नावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विखे यांनी सांगितले.
हजारे व विखे यांच्यामध्ये राळेगण येथे दोन तास चर्चा झाली. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे, स्वामीनाथन आयोग, कृषिमूल्य आयोगाला स्वतंत्र दर्जा या विषयांवर मुद्देसूद चर्चा झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणेही झाले. पुढील आठवड्यात याबाबत चर्चेची पुढची फेरी होणार असून, फडणवीस उपस्थित राहणार आहेत. चर्चेतूनच यशस्वी मार्ग निश्चित निघेल असा विश्वास विखे यांनी व्यक्त केला. देशामध्ये कोविड लस देण्याचा सुरू झालेला प्रारंभ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताचे पडलेले यशस्वी पाऊल असल्याचे विखे म्हणाले.
( १६ राधाकृष्ण विखे-अण्णा हजारे)