इंडियन आयडॉल स्पर्धेत नगरच्या अंजली गायकवाडची छाप, मतदानाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 15:26 IST2021-02-07T15:24:11+5:302021-02-07T15:26:26+5:30
सारेगमप स्पर्धेची लिटील चॅम्पियन ठरलेली अंजली गायकवाड आता इंडियन आयडॉल स्पर्धेच्या १२ व्या फेरीत पोहोचलेली आहे. अंजली गायकवाडचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ती उत्तम सादरीकरण करुन पंचांचे लक्ष वेधून घेत आहे.

इंडियन आयडॉल स्पर्धेत नगरच्या अंजली गायकवाडची छाप, मतदानाचे आवाहन
अहमदनगर : सारेगमप स्पर्धेची लिटील चॅम्पियन ठरलेली अंजली गायकवाड आता इंडियन आयडॉल स्पर्धेच्या १२ व्या फेरीत पोहोचलेली आहे. अंजली गायकवाडचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ती उत्तम सादरीकरण करुन पंचांचे लक्ष वेधून घेत आहे.
या स्पर्धेत तिला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी प्रेक्षकांचे व्होटींगही आवश्यक आहेत. त्यामुळे ज्या दिवशी तिचे सादरीकरण होणार असते, त्याच दिवशी सोनी लाईव्ह या ॲपवर तिच्या छायाचित्रासह लिंक येते. त्यावर प्रेक्षकांनी तिला व्होटींग करावे, असे आवाहन अंजलीचे वडील, अंगद गायकवाड यांनी केले आहे.
आज, रविवारी (दि. ७) रात्री अंजली 'भीनी भीनी भोर भोर आयी' हे गीत सादर करणार आहे. तिच्या सादरीकरणानुसार पंच तिला गुण देणार आहेत. त्याचवेळी रविवारी रात्री ८ ते १२ या वेळेत तिच्यासाठी मतदान लिंक्स ओपन होणार आहेत. तिला मतदान करण्यासाठी सोनी लाईव्ह ॲप किंवा फस्ट क्राय डॉट कॉम या ॲपवर मतदान करावे. एका व्यक्तीला ५० मते देता येतात. त्यामुळे सर्वांनी आपल्या लाडक्या अंजलीला मतदान करुन अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आर्शिवाद द्यावेत, असेही तिचे वडील अंगद गायकवाड म्हणाले.