अनिता थिटे यांना पीएच.डी प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:28+5:302021-07-09T04:14:28+5:30
अळकुटी : रांधे (ता. पारनेर) येथील अनिता थिटे-आवारी यांना नुकतीच उन्नत प्रौद्योगिकी रक्षा संस्थान, खडकवासला, पुणे (रक्षा अनुसंधान एवं ...

अनिता थिटे यांना पीएच.डी प्रदान
अळकुटी : रांधे (ता. पारनेर) येथील अनिता थिटे-आवारी यांना नुकतीच उन्नत प्रौद्योगिकी रक्षा संस्थान, खडकवासला, पुणे (रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन, रक्षा मंत्रालय, भारत सरकार) तर्फे पीएच.डी प्रदान करण्यात आली. अतिशय कठीण आणि वेगळा विषय असलेल्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील - मल्टिपल टार्गेट ट्रॅकिंग फॉर एअर सर्व्हेलिअन्स सिस्टिम यात त्यांनी शोध प्रबंध सादर केला आहे. या संशोधन कार्याबद्दल संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवारांनी डॉ. अनिता यांचे कौतुक केले.
त्यांचा इंजिनिअर ते डॉक्टर हा प्रवास निश्चितच खडतर आणि प्रेरणादायी आहे. कोरोनासारख्या परिस्थितही न डगमगता घर, ऑफिस आणि पीएच.डीचा प्रबंध अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. या कामी त्यांना कुटुंबीयांचीही उत्तम साथ मिळाली. डॉ. अरुण मिश्रा आणि डॉ. आरती दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभले.
----
०८ अनिता थिटे