अनिता शिंदे गीत गायनात सर्वोत्कृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:22+5:302021-09-13T04:20:22+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील अनिता नवनाथ शिंदे यांनी पारंपरिक गीत गायन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायक विजेतेपद मिळविले. ...

अनिता शिंदे गीत गायनात सर्वोत्कृष्ट
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणी दुमाला येथील अनिता नवनाथ शिंदे यांनी पारंपरिक गीत गायन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गायक विजेतेपद मिळविले. बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन गौरव महाराष्ट्र आयोजित ‘चला जपू या संस्कृती महाराष्ट्राची’ गायन स्पर्धेच्या माध्यमातून पारंपरिक व सांस्कृतिक गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये जात्यावरील ओव्या, भारूड, पोवाडा, गवळणी, अभंग, लोकगीत, वासुदेवाची गाणी, जागरण गोंधळ, आदिवासी गीते, लग्नगीते, मंगळागौर, कानबाई, गौरीगीते, पाळणा, भलरी, भोवाडा, सणांची गाणी आदी गायन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. राज्यभरातून या स्पर्धेत १३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये मोठ्या गटात सर्वोत्कृष्ट क्रमांक विजेता म्हणून अनिता शिंदे यांना घोषित करण्यात आले. त्यांनी बाळाचा पाळणा गीताचे गायन केले होते.
110921\4849img-20210910-wa0060.jpg
अनिता शिंदे