शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

जनावरांची ‘छळ’छावणी! : जनावरांच्या कानात बिल्लेच बिल्ले शासनाने केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:41 IST

छावणीतील जनावरांना मुबलक चारा मिळण्याऐवजी त्याच्या कानात बिल्ल्यांची संख्याच जास्त झाली आहे. आधी कर्ज प्रकरणाचा बिल्ला, मग विम्याचा बिल्ला, मग पशुधन मोजणीचा बिल्ला व आता पुन्हा बारकोडसाठी आणखी एक बिल्ला.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : छावणीतील जनावरांना मुबलक चारा मिळण्याऐवजी त्याच्या कानात बिल्ल्यांची संख्याच जास्त झाली आहे. आधी कर्ज प्रकरणाचा बिल्ला, मग विम्याचा बिल्ला, मग पशुधन मोजणीचा बिल्ला व आता पुन्हा बारकोडसाठी आणखी एक बिल्ला. शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे जनावरांची ‘छळ’छावणी तर झालीच आहे, परंतु किचकट नियमांमुळे छावणीचालकही रडकुंडीला आले आहेत.पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने गेल्या दोन-अडिच महिन्यांपासून शासनाने जिल्ह्यात छावण्या सुरू केल्या आहेत. सद्यस्थितीत सुमारे पाचशे छावण्या जिल्ह्यात सुरू असून, त्यात सुमारे तीन लाखांहून अधिक जनावरे दाखल आहेत. चारा छावण्यांत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून शासनाने अनेक अटी-शर्टी घालून छावण्यांवर नजर ठेवली. त्यामुळे पहिल्यांदाच गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले, जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथके नेमून त्रुटी असणाºया छावण्यांवर दंडात्मक कारवाईही केली. ही सर्व यंत्रणा दोन महिने चालल्यानंतर राज्य शासनाला छावण्यांत गैरव्यवहार होऊ शकतो, असा संशय आल्याने जनावरांच्या तपासणीसाठी टॅगिंग करून त्याच्या नोंदी मोबाईल अ‍ॅपवर करण्याचा आदेश छावणीचालकांना देण्यात आला.एका खासगी कंपनीचे हे अ‍ॅप छावणीचालकांनी डाऊनलोड करून त्यात प्रत्येक जनावराच्या शेतकºयाचे नाव, त्याचा सात-बारा उतारा, शेतकºयाच्या ओळखीचा पुरावा, जनावरे किती, त्याचे लिंग, कालावधी अशी सर्व माहिती मराठीत भरायची आहे. हा अ‍ॅप मोफत आहे, असे जरी शासनाकडून कळवले असले, तरी जनावरांच्या कानात मारायचे बिल्ले विशिष्ट कंपनीकडूनच विकत घेतले जात आहेत. छावणीचालकांच्या प्रशिक्षणात हे बिल्ले कोठे व किती पैसे भरून मिळतील, याचीही माहिती देण्यात आली. परंतु अद्याप जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी बिल्लेच दाखल झालेले नाहीत. दुसरीकडे या अ‍ॅप कंपनीने छावणीचालकांचे काही मोबाईल क्रमांक रजिस्टरसाठी घेतले आहेत, परंतु ते अजून रजिस्टरच नाहीत. बिल्ले, अ‍ॅपचे रजिस्टेशन, अ‍ॅपमध्ये जनावरांची माहिती भरणे ही प्राथमिक कामेच अद्याप अपूर्ण असताना १५ मे पासून टॅगिंग करण्याची शासनाची अट छावणीचालक कसे पूर्ण करू शकणार हाच मोठा प्रश्न आहे.८ रूपयाला एक बिल्लाबारकोड असणारा हा बिल्ला एका खासगी कंपनीकडून छावणीचालकांना मिळणार आहे. ते बिल्ले कोठून खरेदी करायचे याची माहिती छावणीचालकांना प्रशिक्षणात देण्यात आली. यातील मोठ्या जनावरासाठी एका बिल्ल्याची किंमत ८, तर लहान जनावरासाठी ७ रूपये आहे. यावर १८ टक्के जीएसटी अतिरिक्त आहे. हे पैसे संबंधितांना आॅनलाईन पाठवल्यानंतर ते बिल्ले येणार आहेत. त्यानंतर पशुधन अधिकारी किंवा छावणीचालकानेच हे बिल्ले जनावरांच्या कानात ठोकायचे आहेत.मारक्या जनावरांना बिल्ले कसे लावणार?जनावरांच्या कानातील बिल्ला धरून त्यावरील बारकोड मोबाईलमध्ये स्कॅन करण्यासाठी तीन ते पाच सेकंद लागणार आहेत. रोज सरासरी पाचशे ते सातशे जनावरे असलेल्या छावण्यांत हे काम छावणीचालकाला करून त्याची नोंद प्रशासनाला पाठवायची आहे. छावणीतील काही जनावरे मारके असतात, त्यावेळी त्या जनावराचा मालक तेथे असेलच असे नाही. अशा वेळी त्या जनावराला धरायचे कोणी, असा प्रश्न सारोळा बद्दी येथील बबन रामचंद्र बोरूडे यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय