स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST2021-09-06T04:26:09+5:302021-09-06T04:26:09+5:30

श्रीगोंदा : स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी श्रीगोंद्याचे सुपुत्र अनिल जयसिंगराव घनवट यांची निवड करण्यात आली आहे. अनिल घनवट ...

Anil Ghanwat as the National President of the Independent India Party | स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल घनवट

स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल घनवट

श्रीगोंदा : स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी श्रीगोंद्याचे सुपुत्र अनिल जयसिंगराव घनवट यांची निवड करण्यात आली आहे.

अनिल घनवट यांनी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगले काम केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या कृषी कायद्याबाबतच्या समितीवर त्यांना संधी दिली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्षाच्या संयुक्त कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. यावेळी घनवट यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली.

शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी ललित बहाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षपदी प्रज्ञा बापट, युवा आघाडी अध्यक्षपदी सुधीर बिंदू, स्वतंत्र भारत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अनिल घनवट, स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी मधुसूदन हरणे यांची निवड करण्यात आली.

राज्यात पुढील वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र भारत पक्ष मैदानात उतरणार असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली.

----

०५ अनिल घनवट

Web Title: Anil Ghanwat as the National President of the Independent India Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.