शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नगर महापालिकेच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे; भाजप, राष्ट्रवादीची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:35 IST

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्दे३७ नगरसेवकांनी घेतला उपमहापौर निवडणुकीत सहभागकाँगे्रसचे मुदस्सर शेख, दीप चव्हाण, जयश्री सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीचा बंडखोर गटही मतदान प्रक्रियेत सहभागीमनसेच्या वीणा बोज्जा, सेनेच्या दीपाली बारस्कर, राष्ट्रीवादीचे आरिफ शेख, विपुल शेटीया, काँगे्रसचे मुदस्सर शेख आदींची माघारभाजप, राष्ट्रवादीने माघार घेतल्याने अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीतून भाजप, राष्ट्रवादीने माघार घेतल्याने बोरुडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उपमहपौर निवडण्यासाठी सोमवारी (दि.५) उपमहापौर निवडणूक घेण्यात आली. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे गट नेते समदखान यांनी उपमहापौर पदाचा अर्ज घेतला होता. तर शिवसेनेकडून अनिल बोरुडे, दीपाली बारस्कर, डॉ़ सागर बोरुडे या तिघांनी अर्ज घेतले होते. दरम्यान भाजपने या निवडणुकीत माघार घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने उपमहापौरपद मिळविण्यासाठी ताकद पणाला लावली. सोमवारी निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीने माघार घेतली. राष्ट्रवादीने उपमहापौर निवडणुकीत घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी या निवडणुकीत माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तसेच राष्ट्रवादी मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार नाही, अशीही घोषणा पक्षाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.जिल्हाधिकारी अभय महाजन हे १०.४५ वाजता महापालिकेच्या सभागृहात दाखल झाले. त्यांनी सभागृहातून पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरु झाली. या निवडणुकीतून इतर सर्व इच्छुकांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.उपमहापौर निवडणुकीत भाजपचा दिलीप गांधी गट तटस्थ राहीला तर काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच गांधी गटाचे पाच नगरसेवक सभेला गैरहजर राहिले. भाजपचे बाबा वाकळे, उषा नलावडे, दत्ता कावरे यांनी शिवसेनेला साथ देत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.

टॅग्स :ahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस