अंगणवाडीसेविकेचे एक महिन्याचे मानधन कोविड सेंटरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:20 IST2021-05-16T04:20:15+5:302021-05-16T04:20:15+5:30
जामखेड : रमजान ईदचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील जवळा गावातील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी एक महिन्याचे मानधन ...

अंगणवाडीसेविकेचे एक महिन्याचे मानधन कोविड सेंटरला भेट
जामखेड : रमजान ईदचे औचित्य साधून जामखेड तालुक्यातील जवळा गावातील अंगणवाडी सेविका मीनाताई मुसा शेख यांनी एक महिन्याचे मानधन डॉ. आरोळे कोविड सेंटरला सुपूर्द केले. यावेळी डॉ. रवी आरोळे, राष्ट्रवादीचे सूर्यकांत मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान मुरुमकर, माजी सभापती सुभाष आव्हाड, गटविकास अधिकारी कोकणे, जवळ्याचे सरपंच प्रशांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक धेंडे, देवदैठणचे सरपंच दादासाहेब भोरे, नय्युम शेख समीर शेख, जीवन रेडे उपस्थित होते. यावेळी सूर्यकांत मोरे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
---
१५ जामखेड