...अन् रोहित पवारांनी धरला गाण्यावर ठेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:25 IST2021-08-28T04:25:04+5:302021-08-28T04:25:04+5:30

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचा कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ...

... And Rohit Pawar contracted the song | ...अन् रोहित पवारांनी धरला गाण्यावर ठेका

...अन् रोहित पवारांनी धरला गाण्यावर ठेका

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचा कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संयोजक नितीन धांडे, उद्योजक दादासाहेब थोरात, जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे, शहराध्यक्ष सुनील शेलार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, रवींद्र पांडुळे, काकासाहेब शेळके, सागर लोंढे, नाना गोडसे, नगरसेविका मनीषा सोनमाळी आदींची उपस्थिती होती.

आमदार पवार म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सर्वांच्या प्रेरणास्थान आहेत. त्यांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे, अशी सर्वांची इच्छा होती. त्यासाठी आपण स्वतः आणि महाविकास आघाडी शासनातील सर्व ज्येष्ठांनी प्रयत्न केले. अखेर त्याला यश आले आहे. हे स्मारक उभारण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, या स्मारक समितीवर माझी निवड झाली. हा सन्मान केवळ माझा नसून मतदारसंघातील सर्वांचा आहे. चोंडीचा सर्वांना अभिमान असून हे स्मारक भव्यदिव्य कसे होईल, यासाठी प्रयत्न केले जातील. नितीन धांडे यांनी प्रास्ताविक केले, तर दादासाहेब थोरात यांनी आभार मानले.

-----------

फोटो - २७पवार सत्कार

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार यांचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व धनगर समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. (छाया - मच्छिंद्र अनारसे)

Web Title: ... And Rohit Pawar contracted the song