शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

श्रीगोंद्यातील पुरातन मंदिरे, वाडे, वेशी, बारवा दुर्लक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 16:56 IST

अध्यात्मिक व ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आकर्षण असलेली श्रीगोंदा शहरातील पुरातन मंदिरे, वाडे, वेशी, बारवा व समाधी स्थळे दुर्लक्षित झाली आहेत.  यामध्ये महादजी शिंदे यांच्या वाड्याजवळ असलेले सूर्य मंदिर नामशेष झाले आहे. सरस्वती नदी काठावरील पुरातन ठेवाच नष्ट होतो की काय, अशी स्थिती आहे. 

जागतिक पर्यटन दिन विशेष/ बाळासाहेब काकडे /  श्रीगोंदा : अध्यात्मिक व ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आकर्षण असलेली श्रीगोंदा शहरातील पुरातन मंदिरे, वाडे, वेशी, बारवा व समाधी स्थळे दुर्लक्षित झाली आहेत.  यामध्ये महादजी शिंदे यांच्या वाड्याजवळ असलेले सूर्य मंदिर नामशेष झाले आहे. सरस्वती नदी काठावरील पुरातन ठेवाच नष्ट होतो की काय, अशी स्थिती आहे. महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची गाथा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक संत शेख महमंद महाराज यांच्यामुळे श्रीगोंदा नगरीची ऐतिहासिक, आध्यात्मिक यशोगाथा गुगलवर गेली. त्यामुळे देशी-परदेशी पर्यटकांना हा ठेवा खुणावत आहे. मात्र संत शेख महंमद महाराज मंदिराचा विकास वादात रेंगाळत पडला आहे. अष्टविनायकांची आठ मंदिरे, अष्टभैरवची आठ मंदिरे, नवचंडीकामातेची नऊ मंदिरे, मारूतीची अकरा  मंदिरे, संत राऊळबुबा, संत प्रल्हाद महाराज, संत रोहिदास, संत गोधड महाराज, तसेच लक्ष्मी पांडुरंग, लक्ष्मी नारायण, शनी मारुतीची मंदिर येथे आहेत.  महादजी शिंदे यांचा सात मजली वाडा असून, त्यातील तीन मजले शिल्लक राहिले आहेत. शिंदे घराण्यातील समाधीस्थळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेली आहेत. शहराला चार वेशी होत्या. त्यातील आता केवळ उत्तर व पूर्वमुखी अशा दोनच वेशी राहिल्या आहेत.  त्यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे. श्रीगोंदा शहराची दक्षिण काशी अशी ओळख आहे. राजकीय, सामाजिक रेट्यातून या पुरातन ठेव्याला पुन्हा झळाळी मिळू शकते. तसेच झाले तर निश्चितच श्रीगोंदा शहर वाराणशीप्रमाणे जगाच्या नकाशावर लक्षवेधी ठरेल. त्यातून श्रीगोंदा नगरीच्या विकासाला चालना मिळेल.  

टॅग्स :environmentपर्यावरणAhmednagarअहमदनगर