कथा लेखन स्पर्धेत आनंद काकडे प्रथम, डॉ. शिवाजी काळे द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST2021-04-04T04:22:09+5:302021-04-04T04:22:09+5:30

कुकाणा : नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशिय प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. ...

Anand Kakade first in the story writing competition, Dr. Shivaji Kale II | कथा लेखन स्पर्धेत आनंद काकडे प्रथम, डॉ. शिवाजी काळे द्वितीय

कथा लेखन स्पर्धेत आनंद काकडे प्रथम, डॉ. शिवाजी काळे द्वितीय

कुकाणा : नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशिय प्रतिष्ठाणच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये आनंद काकडे (अहमदनगर) यांच्या कथेला प्रथम क्रमांक तर श्रीरामपूरचे डॉ. शिवाजी काळे यांना द्वितीय क्रमांक मिळाल्याची माहिती प्रतिष्ठाणचे सचिव अध्यापक सुनील पंडित यांनी दिली.

या कथालेखन स्पर्धेत नगर, पुणे, पंढरपूर आदी जिल्ह्यांतून पंचवीसहून अधिक लेखकांनी कथा पाठविल्या होत्या. कथालेखनाचे परीक्षण प्रा. डॉ. संतोष तागड यांनी केले. या स्पर्धेसाठी कोरोना आणि समाज, कोरोना आणि शेतकरी, कोरोना आणि विद्यार्थी असे विविध विषय देण्यात आले होते.

यातील विजेते असे : प्रथम बक्षीस- आनंद काकडे (नगर), द्वितीय- डॉ. शिवाजी काळे (श्रीरामपूर), तृतीय- भास्कर बंगाळे (पंढरपूर), चतुर्थ- योगिता गोर्डे (दौंड), तर उत्तेजनार्थ बक्षीस शिक्षिका साधना प्रसाद कुकडे (नगर ) व सविता अतुल मुनोत ( कुकाणा). बक्षीस स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, दत्तात्रय कोकरे, रवींद्र कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Anand Kakade first in the story writing competition, Dr. Shivaji Kale II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.