पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने खून

By सुदाम देशमुख | Updated: August 16, 2024 15:10 IST2024-08-16T15:09:53+5:302024-08-16T15:10:11+5:30

कामगार असल्याचा पोलिसांकडून अंदाज व्यक्त.

An unknown person was killed with a sharp weapon in Pachegaon Shiwar | पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने खून

पाचेगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा तीक्ष्ण हत्याराने खून

पाचेगाव (जि. अहमदनगर) :  पाचेगाव (ता. नेवासा) शिवारात लाख कॅनॉल नजीक असलेल्या शेतात एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (दि १६) सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

पाचेगाव फाटा ते पाचेगाव रस्त्यावरील लाख कॅनॉल नजीक असलेल्या शेतात शुक्रवारी (दि.१६) सकाळी दहा वाजेच्या सुमारास मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केलेला एका अनोळखी व्यक्तीचा (अंदाजे वय ३५) मृतदेह आढळून आला. 
      
सदर मृत व्यक्ती ही बाहेरील राज्यातील कामगार असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी नेवासा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करिता पाठवण्यात आला आहे.
       
घटनेची माहिती मिळताच नेवास्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक विजय भोंबे, उपनिरीक्षक विकास पाटील, उपनिरीक्षक मनोज आहेर, पोलीस नाईक डमाळे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहे.

Web Title: An unknown person was killed with a sharp weapon in Pachegaon Shiwar