कोपरगावात तीन तासांच्या फरकाने वयोवृद्ध शिंदे दांपत्याचे झाले निधन
By रोहित टेके | Updated: April 4, 2023 16:07 IST2023-04-04T16:07:40+5:302023-04-04T16:07:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील पढेगाव येथील वारकरी सांप्रदय व शेतकरी कुटुंबातील भागीरथीबाई भगीरथ शिंदे (वय ७०) ...

कोपरगावात तीन तासांच्या फरकाने वयोवृद्ध शिंदे दांपत्याचे झाले निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव (जि. अहमदनगर) : तालुक्यातील पढेगाव येथील वारकरी सांप्रदय व शेतकरी कुटुंबातील भागीरथीबाई भगीरथ शिंदे (वय ७०) यांचे मंगळवारी (दि.४) सकाळी सव्वादहाच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता.
अंत्यविधिची तयारी चालु असताना पत्नीच्या जाण्याच्या दुःखात त्यांचे पती ह. भ. प. भगीरथ दगडू शिंदे (वय ७३) यांचेही हृदय विकाराने दुपारी एक वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर एकाचवेळी दुःखाचे दूहेरी संकट कोसळले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पढेगाव वैकुंठभूमीत या दांपत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे एक मुलगी, दोन मुले संतोष आणि परमेश्वर शिंदे असा परिवार आहे.