‘अमृतवाहिनी'च्या विद्यार्थ्यांची एशियन‌‌‌-इंडिया हॅकथॉन स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:29+5:302021-01-25T04:21:29+5:30

२७ केंद्रीय मंत्रालय व १७ राज्य मंत्रालय यांना विविध क्षेत्रात येणारी आवाहने आणि अडथळे ओळखून प्रोब्लेम स्टेटमेंट तयार केली ...

Amrutvahini students selected for Asian-India Hackathon | ‘अमृतवाहिनी'च्या विद्यार्थ्यांची एशियन‌‌‌-इंडिया हॅकथॉन स्पर्धेसाठी निवड

‘अमृतवाहिनी'च्या विद्यार्थ्यांची एशियन‌‌‌-इंडिया हॅकथॉन स्पर्धेसाठी निवड

२७ केंद्रीय मंत्रालय व १७ राज्य मंत्रालय यांना विविध क्षेत्रात येणारी आवाहने आणि अडथळे ओळखून प्रोब्लेम स्टेटमेंट तयार केली जातात. दैनंदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे नाविन्यपूर्ण उकल व संशोधनातून उपाय शोधणे हे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होय. उत्कृष्ट उकल व संशोधन असणाऱ्या संघाला अंतिम फेरीत सहभागी होता येते. सलग ३६ तास प्रोग्रामिंग कोडिंग चालणाऱ्या स्पर्धेतून प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेता येतो. अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विभागातील रोहन कुलकर्णी व तेजस बिडवे या विद्यार्थ्यांची सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'एशियन - इंडिया हॅकॅथॉन- २०२१' या प्रोजेक्ट स्पर्धेत निवड झाली आहे. 'स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२०'मध्ये 'ओरका' संघाला भारत सरकारच्या डीआरडीओ विभागाकडून एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. विद्यार्थ्यांची स्पर्धेच्या विजयानंतर पर्सिस्टंट या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीमध्ये वार्षिक ८ लाख रुपयांच्या पॅकेजसह निवड झाली आहे.

यंदा स्पर्धेत म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, कंबोडिया, सिंगापूर इत्यादी देशातील स्पर्धक अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना विभागप्रमुख प्रा. राहुल पाईकराव, प्रा. कविता रहाणे, प्रा. स्वाती भोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. (वा. प्र.)

...

फोटो -२४अमृतवाहिनी

...

ओळी- एशियन-इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेसाठी निवड झालेल्या अमृत वाहिनीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश व प्राध्यापक.

Web Title: Amrutvahini students selected for Asian-India Hackathon