भूसंपादनाची रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:45+5:302021-03-07T04:18:45+5:30
कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख, सोयगाव, मनेगाव व मल्हारवाडी या चार गावांच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी निळवंडे कालव्यासाठी भूसंपादित केलेल्या ...

भूसंपादनाची रक्कम लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार
कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख, सोयगाव, मनेगाव व मल्हारवाडी या चार गावांच्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी निळवंडे कालव्यासाठी भूसंपादित केलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पूर्तता रांजणगाव देशमुख येथे भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी डॅा. अजित थोरबोले यांच्या उपस्थितीत गुरुवारी करून घेण्यात आली आहे. या मोबदल्याचे सुमारे ७० लाख रुपये लवकरच बँक खात्यात वर्ग होणार आहे.
निळवंडेच्या उर्ध्व प्रवरा डावा कालव्याच्या तळेगाव शाखेची वितरीका क्रमांक ३ च्या ४ ते ७ च्या बांधकामासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून द्यावी, यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना वेगवेगळा वेळ देऊन गर्दी होऊ न देण्याची काळजी महसूल विभागाने घेतली होती. चारही गावातील शेतकऱ्यांनी या कॅंपमध्ये सहभाग नोंदविला. कागदपत्रांची पूर्तता करून दिली. ज्यांनी कागदपत्रे पूर्ण करून दिली, त्या सर्वांची पैसे राष्ट्रीयकृत बँकेत जमा होणार आहे. याअगोदर यांसदर्भात दोनदा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. राहिलेल्या शेतकऱ्यानी लवकर कागदपत्रांची पूर्तता करू द्यावी, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
या कॅम्पसाठी नगर येथील महसूल विभागाचे रेणुका येंबारे, मंगेश ढुमणे, पोहेगावचे मंडलाधिकारी बी. के. जेठगुले, काकडीचे तलाठी कोळगे, तलाठी आर.एस. इंगळे, बी.जी. मैड, एन.डी. घारे, उर्ध्व प्रवरा डावा कालव्याच्या तळेगाव शाखेचे गणेश सोनवणे यांनी मदत केली.