अमित चिंतामणी यांच्याकडून अरोळे कोविड सेंटरला ४० ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:25+5:302021-04-09T04:22:25+5:30
जामखेड : शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता लक्षात घेऊन नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा ...

अमित चिंतामणी यांच्याकडून अरोळे कोविड सेंटरला ४० ऑक्सिजन सिलिंडर
जामखेड : शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता लक्षात घेऊन नगर परिषदेचे माजी पाणी पुरवठा सभापती अमित चिंतामणी यांनी येथील डॉ. अरोळे कोविड सेंटरला ४० ऑक्सिजन सिलिंडर दिले आहेत. तसेच यापुढील काळातही मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्या समवेत नगरसेवक अमित चिंतामणी यांनी डॉ. आरोळे कोविड हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली होती. यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोभा अरोळे व रवी अरोळे यांनी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे सांगून जनरेटरसाठी डिझेलची मागणी केली होती.
त्यानंतर चिंतामणी यांनी डॉ. अरोळे कोविड सेंटरमधील रुग्णांची वाढती संख्या पाहून तातडीने ४० ऑक्सिजन सिलिंडर भेट दिले. डॉ. रवी अरोळे यांनी चिंतामणी यांच्याकडून सिलिंडर स्वीकारले. यावेळी ॲड. प्रवीण सानप, नितीन तवटे, केदार रसाळ, सचिन मासाळ, शिवकुमार डोंगरे, उमाकांत कुलकर्णी, गणेश काळे, अतुल पवार, नितीन जगताप, संतोष निमोणकर, निखिल कुलथे, आनंद भनगे उपस्थित होते.
--
०८ जामखेड कोविड
जामखेड येथे डॉ. अरोळे कोविड हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवी अरोळे यांनी नगरसेवक अमित चिंतामणी यांच्याकडून ऑक्सिजन सिलिंडर स्वीकारताना.