आमदार निधीतून रुग्णवाहिका मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:20+5:302021-05-04T04:10:20+5:30
देवळाली प्रवरासाठी आमदार निधीतून अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी, असे निवेदन देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस ...

आमदार निधीतून रुग्णवाहिका मिळावी
देवळाली प्रवरासाठी आमदार निधीतून अद्ययावत कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी, असे निवेदन देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांना दिले आहे. देवळाली प्रवरा हे सुमारे ४० हजार लोकसंख्येचे मोठे शहर आहे. सध्या कोरोनाचा कहर सुरू असून काही खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची अक्षरशः लूट सुरू आहे. रुग्णांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यास उपचाराअभावी काही रुग्ण दगावत आहेत.
देवळाली प्रवरा शहराला सर्व सुविधांनी युक्त अशी रुग्णवाहिका अत्यंत गरजेची आहे. स्थानिक विकास निधीतून सर्व सुविधांनी युक्त कार्डियाक रुग्णवाहिका मिळावी, अशी विनंती ढुस यांनी कानडे यांना केली आहे.