रोहित पवारांकडून जिल्हा उप रुग्णालयाला ॲम्ब्युलन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST2021-04-30T04:26:12+5:302021-04-30T04:26:12+5:30

कर्जत : आमदार रोहित पवार यांच्या निधीतून तालुक्यातील रुग्णांसाठी एक अ‍ॅम्ब्युलन्स, तर कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना ...

Ambulance from Rohit Pawar to District Sub Hospital | रोहित पवारांकडून जिल्हा उप रुग्णालयाला ॲम्ब्युलन्स

रोहित पवारांकडून जिल्हा उप रुग्णालयाला ॲम्ब्युलन्स

कर्जत : आमदार रोहित पवार यांच्या निधीतून तालुक्यातील रुग्णांसाठी एक अ‍ॅम्ब्युलन्स, तर कर्जत तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोना काळात मदत म्हणून धान्य, किराणा व पाण्याच्या टाक्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या.

तालुक्यातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय अधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या शेकडो रुग्णांवर कर्जत व गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तालुक्यातील प्रशासनास सहकार्य करण्यासाठी व रुग्णांना तातडीने व मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या निधीमधून एक अद्ययावत अ‍ॅम्ब्युलन्स येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द केली आहे.

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन टन धान्य, किराणा व पाण्याच्या टाक्या तहसीलदार नानासाहेब आगळेे यांच्याकडे सुपूर्द करून मदतीचा हात दिला. यावेळी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, नगरसेविका मनीषा सोनमाळी, शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, भास्कर भैलूमे, नाना निकत आदी उपस्थित होते.

---

२९ कर्जत एनसीपी

आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील जनतेसाठी अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. ही ॲम्ब्युलन्स तहसीलदार नानासाहेब आगळेे यांच्याकडे सुपूर्द करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे व इतर.

Web Title: Ambulance from Rohit Pawar to District Sub Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.