चिचोंडी पाटीलच्या ग्रामीण रुग्णालयास मिळाली रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:34 IST2021-05-05T04:34:04+5:302021-05-05T04:34:04+5:30

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयास अमीर उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय मोरे यांनी रुग्णवाहिका, दोन ...

Ambulance received at Chichondi Patil's rural hospital | चिचोंडी पाटीलच्या ग्रामीण रुग्णालयास मिळाली रुग्णवाहिका

चिचोंडी पाटीलच्या ग्रामीण रुग्णालयास मिळाली रुग्णवाहिका

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयास अमीर उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय मोरे यांनी रुग्णवाहिका, दोन जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका कालिंदा मुरलीधर पुंडे यांनी वाफेचे मशीन, खोकल्याचे औषध, पीपीई कीट भेट दिले आहेत.

हरिओम हेल्पलाईनकडून सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आठवड गावचे सुपुत्र व पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक अमीर उद्योग समूहाचे अध्यक्ष विजय झुंबर मोरे आणि त्यांच्या भगिनी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका कालिंदा मुरलीधर पुंडे यांनी तातडीने भरीव मदत केली.

यावेळी युवा नेते शरद पवार, आठवडचे सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच बाबासाहेब मोरे, डॉक्टर राहुल पवार, ग्रामीण रुग्णालयच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे, संतोष कोकाटे, विजय कोकाटे, सुभाष दिलवाले, चंद्रकांत पवार, मामा परभणे, संतोष वाडेकर, बबनराव शेळके, दत्ता जाधव, अमोल ठोंबरे, सुरेश पवार, गजू शेंदुरकर, चक्रपाणी ठोंबरे, युवराज हजारे, भाऊ करांडे, दादा पवार, निखिल पवार, जितू गाडे, बाळू खकाळ आदी उपस्थित होते.

---

०३ चिचोंडी ॲम्ब्युलन्स

Web Title: Ambulance received at Chichondi Patil's rural hospital