अंबिका महिला पतसंस्थेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:15+5:302021-05-28T04:16:15+5:30

श्रीरामपूर : येथील अंबिका महिला सहकारी पतसंस्थेस नाशिक विभागातील महिला गटात १०० कोटी रुपये ठेवी असलेला प्रथम क्रमांकाचा राज्य ...

Ambika Mahila Patsansthacha | अंबिका महिला पतसंस्थेचा

अंबिका महिला पतसंस्थेचा

श्रीरामपूर : येथील अंबिका महिला सहकारी पतसंस्थेस नाशिक विभागातील महिला गटात १०० कोटी रुपये ठेवी असलेला प्रथम क्रमांकाचा राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे. ऑनलाइन पध्दतीने संस्थेस राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा सुशीला नवले, संचालिका रेखा घाटे, कुसुम जाधव, अनिता माळी, लता धनवटे, कुसुम मोहन यांनी स्वीकारला. हा पुरस्कार पतसंस्था चळवळीत दिशादर्शक काम असणाऱ्या पतसंस्थांना देण्यात येतो. त्यासाठी संस्थेची ठेव वृध्दी, कर्जवितरण, गुंतवणूक, भागभांडवल, स्वनिधी, नफा, लेखापरीक्षण वर्ग, सामाजिक कार्य तसेच कोरोना काळात ग्राहकांना दिलेली सेवा या बाबी विचारात घेतल्या जातात.

सलग ५ व्या वर्षी पतसंस्थेला पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संचालक मंडळाचे पारदर्शक कामकाज, सेवक वर्गाची तत्पर सेवा, दैनिक ठेव प्रतिनिधींचे ठेव वृध्दीचे कामकाज यामुळे संस्थेच्या प्रगतीसाठी चालना व प्रोत्साहन मिळाले आहे, असे प्रतिक्रिया अध्यक्षा सुशीला नवले यांनी दिली.

---

Web Title: Ambika Mahila Patsansthacha