वांगदरीत अंबिका कोविड सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:21 IST2021-05-14T04:21:11+5:302021-05-14T04:21:11+5:30
काष्टी : नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना ग्राम समितीने वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथे ...

वांगदरीत अंबिका कोविड सेंटर सुरू
काष्टी : नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना ग्राम समितीने वांगदरी (ता. श्रीगोंदा) येथे सुरू करण्यात आलेल्या ३० बेडची सुविधा असलेल्या अंबिका कोविड सेंटरचे उद्घाटन तहसीलदार प्रदीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी राजेंद्र नागवडे होते.
राजेंद्र नागवडे म्हणाले, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम क्वाॅरण्टाइन झाले तर घरातील इतर सदस्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अंबिका कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार व मोफत भोजनाची व्यवस्था केली जाईल.
यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, आरोग्य डॉ. प्रशांत मोरे, सरपंच आदेश नागवडे, उपसरपंच शिवाजीराव चोरमले, माजी सरपंच महेश नागवडे, संजय नागवडे, तुषार नागवडे, धनाजी चोरमले, विश्वनाथ भुजबळ, माजी सरपंच दगडू सोनलकर, ग्रामविकास अधिकारी अडागळे, हनुमंत काटे, राजेंद्र नागवडे उपस्थित होते. प्रास्ताविक आबासाहेब जगताप यांनी केले. बी.बी. गोरे यांनी आभार मानले.