आंबीखालसा येथे दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 15:46 IST2017-09-26T15:30:01+5:302017-09-26T15:46:34+5:30

बोटा :  नाशिक पुणे महामार्गालगत आंबीखालसा येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडून रोख रक्कम, मोबाईल व वायर साहित्य ...

In Ambekhalasa, two shops were broken | आंबीखालसा येथे दोन दुकाने फोडली

आंबीखालसा येथे दोन दुकाने फोडली

बोटा :  नाशिक पुणे महामार्गालगत आंबीखालसा येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी दोन दुकाने फोडून रोख रक्कम, मोबाईल व वायर साहित्य असा जवळपास ३० हजारांहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास केला.
 आंबीखालसा येथे राष्ट्रीय महामार्गालगत राजू गाडेकर यांचे सदगुरू मोबाईल शॉपी व मंगेश गाडेकर यांचे राहुल इलेक्ट्रॉनिक हे दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूने खड्डा खणून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर एका दुकानाच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. 
  चोरट्यांनी मोबाईल शॉपीमधून दहा हजार तसेच दुरूस्तीला आलेले  पंधराहून अधिक मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक दुकानातील पाच हजार रुपये किंमतीचा वायर बंडल असा ऐवज लांबवून पोबारा केला. मंगळवारी सकाळी चोरीचा हा प्रकार राजू गाडेकर यांच्या निदर्शनास आला. या दुकानांपासून जवळच घारगाव पोलीस ठाणे असतानाही चोरट्यांनी चोरीचे धाडस केले. गाडेकर यांनी याबाबत घारगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

Web Title: In Ambekhalasa, two shops were broken