अमळनेरच्या तरूणाची २३ लाखात फसवणूक
By Admin | Updated: January 12, 2017 22:37 IST2017-01-12T22:37:51+5:302017-01-12T22:37:51+5:30
अभियांत्रिकी महाविद्यालयात पास करुन देतो व नोकरी लावून देतो असे आमिष देवून अमळनेर येथील तरुणाला २२ ते २४ लाख रुपयात फसवून पुन्हा ३२ लाख रुपये

अमळनेरच्या तरूणाची २३ लाखात फसवणूक
ऑनलाइन लोकमत
अमळनेर, दि. 12 - अभियांत्रिकी महाविद्यालयात पास करुन देतो व नोकरी लावून देतो असे आमिष देवून अमळनेर येथील तरुणाला २२ ते २४ लाख रुपयात फसवून पुन्हा ३२ लाख रुपये उकळण्यासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या नाशिकच्या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एकास अमळनेर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतले आहे.
आशुतोष विलास देसले (२९) याचे वडील यकृताच्या कर्करोगाने आजारी असून आई पारोळा येथे जि.प.शाळेत शिक्षिका आहेत. आशुतोष नाशिक येथे कर्मवीर बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिक इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. तिसऱ्या वर्षात तो तीन विषयात नापास झाला. नोकरी लागणार नाही म्हणून त्याने ही बाब मित्र सुशांत राजपूत यास सांगितली. सुशांतने जुलै २०१५ मध्ये युगंधर पवार याच्याशी ओळख करुन दिली. त्यावेळी युगंधरने नापास विषयात पास करुन नोकरी लावून देतो त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली. आशुतोषने ही बाब आई सुरेखा देसले यांना सांगितल्यावर त्यांनीही नकार दिला.
आशुतोषने आत्महत्येची धमकी दिली
आईने पैसे दिले नाही तर मी आत्महत्या करुन घेईल असे सांगितल्यानंतर त्याला त्याच्या आईने दीड लाख रुपये दिले.यानंतर युगंधर पवार याने वेळोवेळी पैशांची मागणी केली.
महिला पत्रकाराचे ब्लॅकमेल
त्यानंतर युगंधरच्या फोनवरुन पुन्हा महिला पत्रकार श्वेता पांढरे हिचा फोन आला की टीव्हीला बातमी दिली तर बदनामी होईल म्हणून ती टाळण्यासाठी पैसे मागितले. ३१ डिसेंबर रोजी युगंधरच्या खात्यात पाच लाख रुपये वर्ग केले.अखेर आशुतोषने १० रोजी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरुन युगंधर पगार (शिक्षक कॉलनी मखमलाबाद एरिया नाशिक) व श्वेता पांढरे यांच्याविरुद्ध भादंवि ४२०, ४०६, ५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.