माळेगाव शाळेला माजी विद्यार्थ्यांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:21 IST2021-01-20T04:21:30+5:302021-01-20T04:21:30+5:30

अकोले तालुक्यातील माळेगाव या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत २० वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेले शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत ...

Alumni visit Malegaon School | माळेगाव शाळेला माजी विद्यार्थ्यांनी दिली भेट

माळेगाव शाळेला माजी विद्यार्थ्यांनी दिली भेट

अकोले तालुक्यातील माळेगाव या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत २० वर्षांपूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेले शाळेचे माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. माजी विद्यार्थी बाळू सुकटे यांनी शाळेसाठी पोर्टेबल साऊंड सिस्टिम भेट दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील देवराम सुकटे होते. केंद्रप्रमुख सुपे, मेंगाळ, प्रा संजय देशमुख, रामकृष्ण सुकटे, सरपंच पुष्पा भांगरे, दीपक सुकटे उपस्थित होते.

प्रास्ताविक शिक्षक मच्छिंद्र देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन दीपक सुकटे यांनी केले. आभार जयराम कोकतरे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी डॉ. योगेश सुकटे, सुनील सुकटे, विनोद सुकटे, डॉ. दयानंद शेळके, डॉ. योगेश धोंगडे, मनीषा इरणक, रामदास देशमुख, संजय लोहरे, गोपीनाथ सुकटे, माधुरी देशमुख, भारत लोहरे, राजू लोहरे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Alumni visit Malegaon School