आरोग्य उपकेंद्रातही कोविड लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:20 IST2021-04-24T04:20:47+5:302021-04-24T04:20:47+5:30
शेवगाव : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, तसेच लसीकरण सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणेच प्राथमिक आरोग्य ...

आरोग्य उपकेंद्रातही कोविड लस द्या
शेवगाव : तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा मुबलक प्रमाणात पुरवठा व्हावा, तसेच लसीकरण सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्येदेखील उपलब्ध व्हावी, अशी मागणी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.
कोविड-१९ साथीचा संसर्ग शेवगाव तालुक्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाला आहे. ग्रामीण भागात १०० टक्के लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, या लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाची मोहीम खंडित होत आहे. एका आरोग्य केंद्रावर दिवसात फक्त अंदाजे १०० व्यक्तींनाच लस दिली जाते. एकूणच खेड्यातील आकडेवारी पाहता ४५ वर्षांवरील वय असलेल्या मोजक्या लोकांचे लसीकरण झाले आहे.
एका प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अंदाजे १६ ते २० गावे येतात. अशा परीस्थितीत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या व अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकसंख्या पाहता वेळेत लसीकरण होणे अवघड आहे. त्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या प्रवासी वाहतुकीमुळे ग्रामीण भागातून १५ ते २० कि.मी. अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येणे ग्रामस्थांसाठी गैरसोयीचे आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.