शिक्षणाबरोबरच अध्यात्म, निसर्गाचे जतन आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:58+5:302021-09-07T04:25:58+5:30
भातकुडगाव : अध्यात्मातील संत वैकुंठवासी वामनभाऊ महाराज आणि शिक्षण, सहकारातील लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी समाजाला दिशा आणि ...

शिक्षणाबरोबरच अध्यात्म, निसर्गाचे जतन आवश्यक
भातकुडगाव : अध्यात्मातील संत वैकुंठवासी वामनभाऊ महाराज आणि शिक्षण, सहकारातील लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी समाजाला दिशा आणि स्थिरता प्रदान करण्याचे कार्य केले. त्यांच्या विचारांचे अनुकरण करत शिक्षणक्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाबरोबरच, आरोग्य, निसर्ग व अध्यात्माचे जतन करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले यांनी केले.
शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वडुले खुर्द (ता. शेवगाव) येथील श्री संत वामनभाऊ विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका हिरा शिपनकर/शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री, प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, मुख्याध्यापक किसन चव्हाण, सरपंच बाळासाहेब आव्हाड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, अजय देशमुख, रवींद्र मोटे, रामकिसन सासवडे, विजय काशीद, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.
प्रास्ताविक बाळासाहेब सुसे यांनी केले. अरुण बोरुडे यांनी आभार मानले.
----
०६ वडुले खुर्द
वडुले खुर्द येथील संत वामनभाऊ विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी डॉ. नरेंद्र घुले आदी.