दारुबंदी केलेल्या राजूरमध्ये सव्वा सात लाखांची दारु जप्त

By Admin | Updated: April 11, 2017 17:34 IST2017-04-11T17:34:23+5:302017-04-11T17:34:23+5:30

बारा वर्षांपूर्वी संपूर्ण दारुबंदी केलेल्या राजूर गावात मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून सात लाख चोवीस हजार एकशे आठ रुपयांचा देशी-विदेशी दारुचा अवैध साठा जप्त केला.

Almost seven lakh liquor seized in the liquor baroned Rajur | दारुबंदी केलेल्या राजूरमध्ये सव्वा सात लाखांची दारु जप्त

दारुबंदी केलेल्या राजूरमध्ये सव्वा सात लाखांची दारु जप्त

ोले : बारा वर्षांपूर्वी संपूर्ण दारुबंदी केलेल्या राजूर गावात मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून सात लाख चोवीस हजार एकशे आठ रुपयांचा देशी-विदेशी दारुचा अवैध साठा जप्त केला. चार जणांना अटक करण्यात आली आहे.१२ वर्षांपूर्वी २००५ ला राजूर गावात वाजत गाजत संपूर्ण दारुबंदी झाली. याचा राज्यात गाजावा झाला. महिला व तरुणाईच्या पुढाकारातून सरकारमान्य देशी दारुचे दुकान,परमिटरुम बंद करण्यात आले. त्यावेळी करावा लागलेला संघर्ष राजूरकरांच्या डोळ्यासमोर आजही आहे. मात्र पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे या गावात गेल्या काही दिवसांपासून चोरट्या मार्गाने दारु विक्री सुरु झाली आहे. आतापर्यंत किरकोळ स्वरुपात अवैध दारु जप्त करण्यात आली. पण मंगळवारी पहाटे चार वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संगमनेर विभागाचे प्रभारी निरीक्षक यु. पी. बर्डे, कर्मचारी आर. बी. कदम, विपुल कर्पे, सुधीर नागरे, शंकर लवांडे, व्ही. एम. पाटोळे, व्ही. एच. गवांदे, मोहिनी घोडेकर तसेच राजूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक भरत जाधव त्यांच्या सहकाºयांनी राजूर परिसरात चार ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. यात अवैध विक्रीसाठी जात असलेली सव्वा सात लाख रुपयांच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. राजूर तेथील एका खडी स्टोन क्रशरजवळ महिंद्र मॅक्स सवारी (क्र.एम.एच.१४ पी.५०२८) गाडीत विदेशी दारु विक्रीसाठी नेली जात असताना पकडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चार आरोपींना अटक केली. सव्वा सात लाखाची देशी विदेशी दारु मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Web Title: Almost seven lakh liquor seized in the liquor baroned Rajur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.