नऊ किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी
By Admin | Updated: August 26, 2014 23:21 IST2014-08-26T23:10:30+5:302014-08-26T23:21:21+5:30
अहमदनगर: भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी महापालिका वीज वितरण कंपनीला नऊ किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी देणार आहे.

नऊ किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी
अहमदनगर: भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी महापालिका वीज वितरण कंपनीला नऊ किलोमीटर रस्ते खोदाईला परवानगी देणार आहे. तसा निर्णय प्रशासनाने घेतला असून परवानगीचे पत्र वीज वितरण कंपनीला दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्र शासनाकडून शहरात वीज वाहिनी भूमिगत करण्यासाठी जवळपास ५५ कोटी रुपयांचा निधी वीज वितरण कंपनीला प्राप्त झाला आहे. शहरातील रस्ते अरुंद असल्याने ते रुंद करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. गत दोन वर्षापासून हा निधी तसाच पडून आहे. आता नोव्हेंबरपर्यंत तो खर्च न झाल्यास निधी परत केंद्राकडे जाईल. त्यामुळे खासदार दिलीप गांधी व महावितरण कंपनीने महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला. जे रस्ते भविष्यात रुंद करता येणार नाही त्या मार्गावर विनाअट वीज वितरण कंपनीला भूमिगत वीज वाहिनी टाकण्यास परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.