संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ कोपरगावात सर्वपक्षीय मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 17:08 IST2018-08-13T17:07:37+5:302018-08-13T17:08:00+5:30
संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ कोपरगावात सर्वपक्षीय मोर्चा काढून तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आले.

संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ कोपरगावात सर्वपक्षीय मोर्चा
कोपरगाव : संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ कोपरगावात सर्वपक्षीय मोर्चा काढून तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी समाज कंटकांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली .
दिल्ली येथे ९ आॅगस्ट रोजी जंतर मंतर येथे मनुवादी देशद्रोही यांनी संविधानाची प्रत जाळत घोषणाबाजी करून देशाचा अपमान केला. या घटनेच्या निषेधार्थ हे कृत्य करणा-या देशद्रोहीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सोमवारी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान ते तहसिल कार्यालय या मार्गाने मोर्चा नेण्यात आला. यावेळी हाजी महेमूद सय्यद, शरद थोरात, विजय त्रिभुवन, अशोक आव्हाटे, अशोक शिंदे, अस्लम शेख, विलास अहिरे, अँड.नितीन पोळ, मौलाना निसार, संदीप वर्पे, नितीन बनसोडे, राजेंद्र सोनवणे, दीपक गायकवाड, शांताराम रणशूर, विजय वहाडणे, अजित झोडगे, जितेन्द्र रणशूर आदिंनी मनोगत व्यक्त केले.संविधान प्रतीचे वाचन अॅड.नितीन पोळ यांनी केले.