शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अळकुटी, कळस, रांधे, दरोडीचा कांदा लंडनला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:36 IST

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शेतक-याची कांदा विक्रीची मोठी अडचण झाली आहे. पारनेर येथील प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने शेतक-यांचा कांदा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतकºयांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्याचे काम सुरू केले आहे.

अळकुटी : कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन असल्याने शेतक-याची कांदा विक्रीची मोठी अडचण झाली आहे. पारनेर येथील प्रसन्ना कृषी उद्योग समुहाने शेतक-यांचा कांदा विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. शेतक-यांचा कांदा जास्त भावाने खरेदी करून समुद्रमार्गे थेट लंडनला पाठविण्याचे काम सुरू केले आहे.शेतक-यांच्या सोयीसाठी उद्योजक किरण डेरे, विकास गांधी यांनी खासगी कांदा मार्केट सुरू केले. गेल्या पाच वर्षांपासून मार्केटच्या माध्यमातून ते शेतक-यांच्या मालाला योग्य भाव देत आहेत. मार्केटपेक्षा दोन ते तीन रुपये किलोमागे कांद्याला जास्त भाव दिला आहे. थेट शेतावर जाऊन कांदा खरेदी केला जात आहे.  शेतकºयांकडून गोणी, मजुरी, तोलाई, मापाई, हमालीचे पैसे घेतले जात नाहीत. रांधे, दरोडी, कळस, पाडळी आळे, गारखिंडी, अळकुटी परिसरातील गावांमधून कांदा खरेदी करण्यात येतो. कंटेनरमध्ये २५ टन कांदा मजुरांमार्फत भरला जातो. मुंबईत गेल्यानंतर जहाजामधून हा कांदा लंडनकडे रवाना करण्यात येतो. 

बांधावर जाऊन कांदा खरेदी होत आहे. जास्त भाव दिल्याने शेतकरी समाधानी आहेत. कांद्याचा कंटेनर पोहचायला २७ दिवस लागतात. दर आठ दिवसांनी २५ टन कांदा येथून भरण्यात येतो. कांद्याचे अडीच किलोचे पॅकेट तयार करून पाठविले जातात, असे प्रसन्ना कृषी उद्योग समुहाचे संचालक किरण डेरे यांनी सांगितले.  

आम्ही पाच वर्षांपासून प्रसन्ना कृषी उद्योग समूहामधून शेतक-यांच्या कांद्याला योग्य भाव देत आहोत. आताही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कांदा शेताच्या बांधावर जाऊन खरेदी करत आहोत. यामुळे शेतक-यांनाही कांद्याला चांगला भाव मिळत आहे, असे कळस येथील शेतकरी सुभाष गलांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरonionकांदाFarmerशेतकरी