‘आई जगदंबे’चा नेवाशात गजर

By Admin | Updated: September 30, 2014 23:20 IST2014-09-30T23:04:50+5:302014-09-30T23:20:59+5:30

नेवासा : नेवाशासह तालुक्यात शारदीय नवरात्रौत्सवाची धूम जोरात चालू आहे. देवीची मंदिरे ‘आई जगदंबे’च्या जयघोषाने दुमदुमत आहेत.

The alarm surrounding the 'I Jagdambay' | ‘आई जगदंबे’चा नेवाशात गजर

‘आई जगदंबे’चा नेवाशात गजर

नेवासा : नेवाशासह तालुक्यात शारदीय नवरात्रौत्सवाची धूम जोरात चालू आहे. देवीची मंदिरे ‘आई जगदंबे’च्या जयघोषाने दुमदुमत आहेत. मात्र ‘महावितरण’ने सुरु केलेल्या भारनियमनामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.
नेवासा येथे ग्रामपंचायत चौकात छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने सादर केलेले ‘कारंजा नृत्य’ आकर्षण ठरत आहे. डॉ. हेगडेवार चौकात एकता तरुण मंडळाने भव्य विद्युत रोषणाई केली आहे. मोहिनीराज मंदिरासमोर काशिविश्वेश्वर तरुण मंडळाने मारुती चौकात महिलांनी शास्त्रोक्त पध्दतीने देवीची प्रतिष्ठापना केली आहे. खळवाडी येथील योगी मनोहरनाथ बहुउद्देशीय प्रतिष्ठानने व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रमांव्दारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.
नेवासा शहरातील बसस्थानक प्रांगणात रिक्षा संघटनेने दुर्गादेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रात्री होणाऱ्या आरत्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
ज्ञानोदय इंग्लिश स्कूल समोरील सप्तशृंगी माता मंदिर, खळवाडी येथील संतोषी माता मंदिर, बसस्थानक रोडवरील भाऊ घोलप यांच्या वखार प्रांगणात नवीन मळगंगा देवी मंदिर येथेही रात्री महिला भाविकांची गर्दी होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The alarm surrounding the 'I Jagdambay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.