नगरमध्ये अक्षयकुमारला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST2020-12-27T04:16:27+5:302020-12-27T04:16:27+5:30

याप्रकरणी डॉक्टर अक्षयकुमार अनिल साठे (३०) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गावडे (पूर्ण नाव माहीत नाही), सुवर्णा गावडे, ...

Akshay Kumar beaten in town | नगरमध्ये अक्षयकुमारला मारहाण

नगरमध्ये अक्षयकुमारला मारहाण

याप्रकरणी डॉक्टर अक्षयकुमार अनिल साठे (३०) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गावडे (पूर्ण नाव माहीत नाही), सुवर्णा गावडे, विवेक गावडे व गावडे याच्यासाेबत पिवळा शर्ट घातलेली अनोळखी व्यक्ती (सर्व रा. गावडे मळा) आदींच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. अक्षयकुमार साठे हे शनिवारी सकाळी त्यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये बसलेले असताना गावडे नावाची व्यक्ती त्याच्या घराच्या वरील मजल्यावर गॅलरीच्या भिंतीला पाणी मारत होती. हे पाणी अक्षयकुमार यांच्या अंगावर पडले. यावेळी त्यांनी गावडे याला दुसरीकडे पाणी मारा, असे सांगितले. याचाच राग येऊन गावडे व इतर तिघांनी डॉक्टरच्या कंपाउंडमध्ये घुसून त्यांना मारहाण करत जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक जाधव हे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Akshay Kumar beaten in town