अकोळनेरची पेशवेकालीन वेस ढासळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 13:12 IST2017-09-16T13:11:55+5:302017-09-16T13:12:13+5:30

अकोळनेर ( ता. नगर ) येथील पेशवेकालीन वेस शनिवारी सकाळी अचानक ढासळली. यामुळे कुठलीच जीवित हानी  झाली नसली तरी वेस पडल्याने गावाचे वैभव इतिहासजमा झाल्याची खंत गावकºयांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील जुन्या वेस पैकी ही वेस मानली जात होती.

Akolner's Peshwa Descending Wes | अकोळनेरची पेशवेकालीन वेस ढासळली

अकोळनेरची पेशवेकालीन वेस ढासळली

केडगाव : अकोळनेर ( ता. नगर ) येथील पेशवेकालीन वेस शनिवारी सकाळी अचानक ढासळली. यामुळे कुठलीच जीवित हानी  झाली नसली तरी वेस पडल्याने गावाचे वैभव इतिहासजमा झाल्याची खंत गावकºयांनी व्यक्त केली. नगर तालुक्यातील जुन्या वेस पैकी ही वेस मानली जात होती.
  वाड्यांचे गाव असलेल्या अकोळनेर येथे गावाच्या दर्शनी भागातच पेशवेकालीन वेस आहे. या वेसीचा बुरूज अचानक ढासळला. गावात अनेक जुने वाडे होते यातील काही वाडे अजुनही पहावयास मिळतात. तर  काहींचे फक्त अवशेष आहेत. नगर तालुक्यात अनेक गावांमध्ये जुुन्या काळातील वेस आहेत यामध्ये अकोळनेरची वेस सर्वात जुनी असल्याचे गावकरी सांगतात .

Web Title: Akolner's Peshwa Descending Wes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.