अकोलेत ६१ दात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:18 IST2021-07-17T04:18:02+5:302021-07-17T04:18:02+5:30
आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात झाली. यावेळी युवा नेते विक्रम नवले, रमेश जगताप, ...

अकोलेत ६१ दात्यांनी केले रक्तदान
आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिरास सुरुवात झाली. यावेळी युवा नेते विक्रम नवले, रमेश जगताप, शिवाजी नेहे, साईनाथ नवले, सुजीत नवले, उबेद शेख, अनिल शेटे, सचिन जगताप, भास्कर मंडलिक, आमदार डॉ. लहामटे म्हणाले, रामदास शेटे उपस्थित होते. रक्तदान हे श्रेष्ठदान व राष्ट्रीय कार्य असून शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांच्या सामाजिक कार्याची नक्कीच दखल घेतली जाते. तालुक्यातील युवकांनी जागृत ठेवलेले समाजभान कौतुकास्पद आहे.
राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षातील युवक कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, शिक्षक नेते, अभिनव परिवार, बुवासाहेब पतसंस्था, पत्रकार यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत योगदान दिले. शेतकरी नेते मधुकरराव नवले, राष्ट्रीय काँग्रेसचे सोन्याबापू वाकचौरे, संपत कानवडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, संपत नाईकवाडी, राजेंद्र कुमकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, सूरज नाईकवाडी, महेश नवले, तहसीलदार मुकेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गिरीश बिबवे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्र्यय साबळे, शिक्षक संघटनेचे राजेंद्र सदगीर, आण्णासाहेब आभाळे यांनी शिबिरास भेट दिली. राष्ट्रीय काँग्रेसचे युवा कार्यकर्ते बाबासाहेब नाईकवाडी यांनी ५४ व्या वेळी रक्तदान केले. अर्पण ब्लड बँकच्या प्रमिला कडलग, लोकमत तालुका प्रतिनिधी हेमंत आवारी यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले.
..................
रक्तदाते
तहसीलदार मुकेश कांबळे, कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, गिरीश बिबवे, शिवाजी नेहे, साईनाथ नवले, रामदास धुमाळ, नितीन नाईकवाडी, सूरज नाईकवाडी, महेश शेलार, अक्षय शेणकर, संजय गोरे, ऋत्विक विजय शेटे, अमोल नाईकवाडी, पंकज मंडलिक, वैभव नवले, सौरभ नाईकवाडी, बाळासाहेब नाईकवाडी, मधुकर बनकर, अजीम शेख, सागर घुले, आवेज शेख, नयन नवले, नीरज वाकचौरे, अनिल भोर, संदीप नवले, गणेश पवार, राजेश सदगीर, पोलीस विठ्ठल शरमाळे, सचिन जगताप, अक्षय शेणकर, तुषार शेटे, शांताराम ताजणे, सागर बाळसराफ, संदीप बनकर, राजेंद्र शेणकर, गणेश नवले, सुरेश ताके, श्रेयस नवले, राहुल पाचपुते, अशोक सापिके, संजय जाधव, मयूर शेटे, विशाल शेणकर,
पत्रकार- चंद्रशेखर हासे, गणेश आवारी, सचिन खरात, आण्णा चौधरी.
महिला- स्वाती नवले, वनिता चौधरी, राधिका नवले, संगिता सापिके, अनिता सूर्यवंशी.
शिक्षक- राजेंद्र सदगीर, आण्णासाहेब आभाळे, बाळासाहेब आरोटे.