अकोलेत अवैध दारुवर छापा; पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: June 16, 2017 13:43 IST2017-06-16T13:43:28+5:302017-06-16T13:43:28+5:30
अकोले रस्त्यावर कारमधून अवैध दारुची वाहतूक करणाताना पोलिसांनी तिघांना अटक केली

अकोलेत अवैध दारुवर छापा; पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
आॅनलाईन लोकमत
अकोले, दि़ १६ - तालुक्यातील देवठाण ते अकोले रस्त्यावर कारमधून अवैध दारुची वाहतूक करणाताना पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़
देवठाण ते अकोले रस्त्यावरुन अकोलेकडे एम़एच़ १४, सी़एस़ ११४१ या कारमधून देशी दारुच्या १४४० बाटल्यांची वाहतूक केली जात होती़ ही गाडी कोळगाव फाटा येथे अडवून पोलिसांनी ७४ हजार ८८० रुपये किमतीची दारु व इतर ऐवज असा ३ लाख ७४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी मंगेश कोंडाजी ढोकरे (वय २९), रमेश शेटीबा पवार (वय २३), रोहिदास बाळू पवार (वय २३, सर्व रा़ शाहुनगर, अकोले) यांना पोलिसांनी अटक केली़ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल निपसे, पोलीस नाईक ढोकरे, पोलीस कॉन्स्टेबल कोळगे यांनी ही कारवाई केली़