तिळापूरच्या रस्त्यासाठी अजित पवारांचा उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST2021-09-19T04:21:54+5:302021-09-19T04:21:54+5:30
तिळापूर गावात महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकासामध्ये ‘क’ वर्गात समावेश झालेला असून हजारो भाविक दर्शनासाठी येत ...

तिळापूरच्या रस्त्यासाठी अजित पवारांचा उपोषणाचा इशारा
तिळापूर गावात महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या देवस्थानचा तीर्थक्षेत्र विकासामध्ये ‘क’ वर्गात समावेश झालेला असून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, दुर्दैवाची बाब आशी की त्या देवस्थानकडे जाण्यासाठी रस्ता नाही. १५ वर्षांपासून या रस्त्यासाठी ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत. आमदार, खासदार यांना देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी निवेदने देऊनही रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. त्यामुळे गावातील तरुणांनी उपोषणाची हाक दिली असून १ ऑक्टोबर रोजी संगमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रस्त्यावर उपोषण करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदन श्रीरामपूर तहसीलदार, राहुरी तहसीलदार तसेच श्रीरामपूर-राहुरीचे आमदार लहू कानडे यांना देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, रुपेश हरतल, विजय गवारे, सचिन जाधव, भाऊसाहेब पवार, विशाल यादव, दादाहरी रोठे, विलास गिते, राहुल जाधव, धनंजय पवार, गौरव रोठे, आदिनाथ जाधव आदी उपस्थित होते.
..........
१८ अजित पवार
आमदार लहू कानडे यांना निवेदन देताना अजित पवार, दत्ता जाधव, रुपेश हरतल, विजय गवारे आदी.