एड्सबद्दल जनजागृती उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:36+5:302021-02-05T06:31:36+5:30
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमीच्या वतीने सोमवारी राहुरी येथील भागीरथी ...

एड्सबद्दल जनजागृती उपक्रम
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमीच्या वतीने सोमवारी राहुरी येथील भागीरथी तनपुरे कन्या महाविद्यालयात आयोजित एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमात शिंदे बोलत होत्या. याप्रसंगी प्राचार्य उषा शेंडगे, प्रा. बाळासाहेब निवडूंगे, प्रा. दामिनी म्हस्के, मंगल आढाव, प्रशांत सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक किशोर शिंदे, आरोग्य विभागाच्या समुपदेशक अश्विनी घोरपडे, आदी उपस्थित होते. यावेळी युवक-युवतींसाठी घेण्यात आलेल्या एचआयव्ही-एड्स जनजागृतीवर निबंध, पोस्टर व घोषवाक्य स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, अॅड. महेश शिंदे, अॅड. अनिता दिघे, अॅड. भानुदास होले, पोपट बनकर, अॅड. सुनील तोडकर, रमेश गाडगे आदींचे मार्गदर्शन लाभले.