अहमदनगरची जागा राष्ट्रवादीला जिंकायचीच आहे - जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:15 IST2019-01-22T19:15:10+5:302019-01-22T19:15:47+5:30
लोकसभेची अहमदनगर जागा राष्ट्रवादीकडे आहे. शिर्डीची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत जिकांयचीच आहे,

अहमदनगरची जागा राष्ट्रवादीला जिंकायचीच आहे - जयंत पाटील
अहमदनगर : लोकसभेची अहमदनगर जागा राष्ट्रवादीकडे आहे. शिर्डीची जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला कोणत्याही परिस्थितीत जिकांयचीच आहे, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या लोकसभा आढावा बैठकित ते बोलत होते.
पाटील म्हणाले, अहमदनगर मतदारसंघातील २५ बुथ संघटकांनी प्रत्येक बुथ कमिटी चा आढावा घेतला पाहिजे. बुथ कमिटीचा मेळावा घ्यायचा आहे. आपल्याला थेट शेवट च्या माणसापर्यंत पोहोचायचे आहे. सरकारच्या फसव्या योजना लोकांना समजून सांगा. घरोघर जा. सर्व घटक नाराज आहेत. त्यांच्यापर्यंत जा. पक्ष बळकट करा. संघटन वाढले पाहिजे. बुथ कमिटीच्या काम पूर्ण करा. जे जिल्हा कार्यकरिणीवर आहेत. त्यांनी स्वत: च्या कार्यकसेत्रातील बुथ कमित्या पूर्ण करा. ३१ व १ फेब्रुवारी रोजी परिवर्तन यात्रा नगरमध्ये असेल. येणारी लोकसभा पूर्ण ताकदीने लढवायची आह. कसल्याही परिस्थितीत अहमदनगर लोकसभेची जागा जिंकायची आहे.