VIDEO: पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवलं; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद 

By कुणाल गवाणकर | Updated: September 20, 2020 22:34 IST2020-09-20T22:34:02+5:302020-09-20T22:34:22+5:30

पुरात वाहून जाणाऱ्या व्यक्तीला ग्रामस्थांनी वाचवलं; थरार कॅमेऱ्यात कैद 

in ahmednagar Villagers rescues youth trapped in flood | VIDEO: पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवलं; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद 

VIDEO: पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवलं; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद 

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी) दुपारी घडली.



पुलावरून पाणी वाहत असतानाही तरुणाने आपल्या पत्नीला मोटारसायकलवरुन खाली उतरविले. स्वत: मोटारसायकल पाण्यात घातली. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. नदीत असलेल्या झाडाला अडकल्याने झाडाला पकडून तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पत्नीने आरडाओरड केल्याने शेजारील तुवर वस्तीवरील काही युवक पळत आले. त्यांनी तात्काळ दोरखंड आणले. दोरखंडाने तरुणास ओढून प्रवाहाबाहेर काढले. अर्धा तास हा चित्तथरारक प्रकार सुरु होता.

Web Title: in ahmednagar Villagers rescues youth trapped in flood