अहमदनगरमध्ये एसटीचा अपघात, 13 जण जखमी
By Admin | Updated: May 31, 2017 16:58 IST2017-05-31T16:58:04+5:302017-05-31T16:58:04+5:30
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील 13 प्रवाशी जखमी झाले आहेत.

अहमदनगरमध्ये एसटीचा अपघात, 13 जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 31 - पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसचा अपघात झाला. या अपघातात बसमधील 13 प्रवाशी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील खिंडीत रस्त्याच्या साईडपट्टयावर मुरुम टाकल्याने बसचालकास रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बसचा अपघात झाला. हा अपघात बुधवारी दुपारी 8.30 च्या दरम्यान सातपुते वस्तीजवळ झाला. या अपघातात बसमधील 13 प्रवाशी जखमी झाले. पारनेर डेपोची पिंप्रीजलसेन- पारनेर ही बस होती.
दरम्यान, जखमी प्रवाशांना सुपा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.