अहमदनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत हायमॅक्सचा पोल जमीनदोस्त
By रोहित टेके | Updated: April 18, 2023 17:05 IST2023-04-18T17:04:51+5:302023-04-18T17:05:05+5:30
सुदैवाने पोल पडते वेळी या परिसरात कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला.

अहमदनगर : अज्ञात वाहनाच्या धडकेत हायमॅक्सचा पोल जमीनदोस्त
कोपरगाव (जि. अहमदनगर): शहरातील धारणगाव रोड परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील गजबजलेल्या चौकात असणाऱ्या हायमॅक्सच्या पोलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पोल जमीनदोस्त झाला. सुदैवाने पोल पडते वेळी या परिसरात कोणीच नसल्याने मोठा अनर्थ टळला.
ही घटना मंगळवारी (दि. १८) दुपारच्या सुमारास घडली. मात्र, या पोलचा आधार घेऊन टाकण्यात आलेल्या इतर केबलला अडकून एक तरुण किरकोळ जखमी झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. दरम्यान हा अपघात झाल्यानंतर रहदारीला अडथळा करणारा पोलबराच वेळ तिथेच पडून होता. त्यामुळे वाहनचालकांना येथून ये जा करताना मोठी कसरत करावी लागली.