इलेक्ट्रिक बसेसची माहिती अहमदनगर विभागाकडे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:37+5:302021-09-02T04:45:37+5:30

संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन, घातलेले निर्बंध याचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. ...

Ahmednagar division does not have information about electric buses | इलेक्ट्रिक बसेसची माहिती अहमदनगर विभागाकडे नाही

इलेक्ट्रिक बसेसची माहिती अहमदनगर विभागाकडे नाही

संगमनेर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन, घातलेले निर्बंध याचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर झाला आहे. डिझेलचे दरही वाढले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस चालविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परिवहन महामंडळाच्या अनेक विभागात इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत. मात्र, अहमदनगर विभागात एकूण किती इलेक्ट्रिक बसेस येणार याबाबत माहिती नसल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

‘गाव तेथे एसटी; रस्ता तेथे एसटी’ हे ब्रीद महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जपले आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. अहमदनगर जिल्ह्यातील एसटी बसेसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचे कोरोनाबरोबरच इतरही संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होणार आहे. तसेच परिवहन महामंडळाच्या बसेसला ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’ बसविण्यात आली आहे. एक ॲप विकसित केले असून, त्याद्वारे एका क्लिकवर बसचे लोकेशन कळणार आहे. परिवहन महामंडळ अद्ययावत होत असून प्रवाशांना अधिक चांगल्या सोयी, सुविधा मिळण्यासाठी अनेक प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत.

मुंबईत पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली होती. ‘शिवाई’ असे या बसचे नामकरण करण्यात आले होते. इंधन दरवाढीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी विजेवर चालणाऱ्या बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस चालविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानंतर परिवहन महामंडळाच्या अनेक विभागात या बसेस दाखल होत आहे. पर्यावरणपूरक वाहनांमुळे प्रदूषणाची समस्या कमी होणार आहे. तसेच डिझेलच्या खर्चातही मोठी बचत होणार आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या पहिल्या लाटेत करण्यात आलेला लॉकडाऊन व दुसऱ्या लाटेत ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेले निर्बंध यामुळे दीड वर्षांपासून परिवहन महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते. परिवहन महामंडळाच्या बसेसची थांबलेली चाके आता पुन्हा गतिमान होऊ लागली आहेत. त्यातच आता बसच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार असल्याने याचा परिवहन महामंडळ आणि प्रवाशांनादेखील याचा फायदा होणार आहे. अकोला विभागात ७, अमरावती विभागात ५०, भंडारा विभागात ५५ तसेच यासह इतरही अनेक विभागात इलेक्ट्रिक बसेस पुढील काही महिन्यात धावणार आहेत. मात्र, अहमदनगर विभागात एकूण किती इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार अथवा येणार याबाबत अहमदनगर विभागाकडे अद्याप काही माहिती नसल्याचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी सांगितले.

-------------

विभाग इलेक्ट्रिक बसेसची संख्या

अमरावती ५०

भंडारा ५५

अकोला ०७

----------------

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात एकूण किती इलेक्ट्रिक बसेस येणार याबाबत अद्याप काही माहिती आमच्याकडे आलेली नाही. त्यामुळे त्या संदर्भाने अधिक काही सांगता येणार नाही.

विजय गिते, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, अहमदनगर विभाग

......

star 1118

Web Title: Ahmednagar division does not have information about electric buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.