सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड
By अरुण वाघमोडे | Updated: May 24, 2023 14:04 IST2023-05-24T14:03:20+5:302023-05-24T14:04:29+5:30
भुईकोट किल्ला मैदान येथे झालेल्या निवड चाचणीस 67 फुटबॉल खेळाडूंनी सहभाग नोंदवला.

सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड
अहमदनगर: वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर अंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा संघाची निवड चाचणी घेण्यात आली. भुईकोट किल्ला मैदान येथे झालेल्या निवड चाचणीस 67 फुटबॉल खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यामधील उत्कृष्ट खेळाडूंची अहमदनगर जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली आहे.
24 ते 30 मे दरम्यान शिरपूर (जि. धुळे) येथे सब ज्युनिअर अंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा रंगणार आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा संघ देखील सहभागी होणार असून, संघातील खेळाडूंसाठी निवड चाचणी नुकतीच पार पडली. खेळाडूंचे कौशल्य व त्यांची खेळातील कामगिरी पाहून 18 खेळाडूंची जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली. या संघास व्हिक्टर जोसेफ व झेव्हिअर्स स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.
अहमदनगर जिल्ह्याच्या फुटबॉल संघात कर्णधार कृष्णा टेमकर, उपकर्णधार आदित्य गुगळे, वंश छल्लाणी, सिद्धांत गांधी, जैद शेख, श्वेतांत जाधव, कार्तिक चव्हाण, शुभमकर सावंत, युनूस सय्यद, वीर छल्लाणी, विश्वदीप निंबाळकर, विराज चव्हाण, धैर्य कालपुंड, वीरेन क्षेत्रे, अन्वेष ठाकूर, कुणाल दांगट, सिद्धेश्वर देशमुख, जोएल पाथरे यांची निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याचा पहिला सामना रायगडशी होणार आहे