अहमदनगर जिल्ह्याला तीन मंत्रीपदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 12:26 IST2019-12-30T12:25:19+5:302019-12-30T12:26:28+5:30
महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपरे यांना राज्यमंत्रीपद मिळणार आहे. शिवसेनेच्या कोट्यातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे नेवासा येथील आमदार शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या वाट्याला आता तीन मंत्रीपदे मिळणार आहेत. सर्वात जास्त संख्येने आमदार असल्याने नगर जिल्ह्याला आता तीन मंत्रीपदे मिळणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्याला तीन मंत्रीपदे
बाळासाहेब थोरात यांच्यानंतर शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे होणार मंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महाआघाडीच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपरे यांना राज्यमंत्रीपद मिळणार आहे. शिवसेनेच्या कोट्यातून शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे नेवासा येथील आमदार शंकरराव गडाख हे कॅबिनेट मंत्री होणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्याच्या वाट्याला आता तीन मंत्रीपदे मिळणार आहेत. सर्वात जास्त संख्येने आमदार असल्याने नगर जिल्ह्याला आता तीन मंत्रीपदे मिळणार आहेत.
राहुरीला दुसºयांदा, तर नेवासा मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपद मिळणार आहे. राहुरी मतदारसंघातून तनपुरे हे पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत, तर गडाख हे दुसºयांदा आमदार झालेले आहेत. २००९ मध्ये गडाख हे राष्ट्रवादीकडून आमदार होते, तर यावेळी त्यांचा शेतकरी क्रांतीकारी पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढविली होती. विधानसभेच्या निकालानंतर गडाख यांनी सर्वात आधी शिवसेनेला पाछिब्यांचे पत्र दिले होते. सेनेला पाठिंबा देण्याचा गडाख यांचा निर्णय त्यांना थेट मंत्रीपदापर्यंत घेऊन गेला.
प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी अकोले येथील आमदार डॉ. किरण लहामटे यांना मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले आहे. कालपर्यंत लहामटे यांच्याच मंत्रीपदाची चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांचे भाचे असलेल्या तनपुरे यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली. काँग्रेसच्या पहिल्या मंत्रीमंडळानंतर बºयाच अंतराने राहुरी तालुक्याला मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे.