अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन अॅड. उदय शेळके यांचे निधन
By साहेबराव नरसाळे | Updated: February 11, 2023 16:31 IST2023-02-11T16:30:36+5:302023-02-11T16:31:09+5:30
मुंबईत उपचार सुरू असताना घेतला अखेरचा श्वास

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन अॅड. उदय शेळके यांचे निधन
अहदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन अॅड. उदय शेळके (वय- 46) यांचे दिर्घाजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी 11 वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) येथे अंत्यविधी होणार आहे.
अॅड. शेळके यांना काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा तिव्र झटका आला होता. त्यांच्यावर पुणे येथे खासगी रूग्णालयात उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे गेले पाच महिने ते बेशुद्धावस्थेतच होते. लिलावती रूग्णालयात परदेशी डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यात यश आले नाही. शनिवारी (दि. 11) त्यांनी उपचारास प्रतिसाद देणे बंद केले. त्यानंतर दोन वाजता त्यांचे निधन झाल्याचे हॉस्पीटलने अधिकृत जाहीर केले.
(स्व.) सॉलिसीटर गुलाबराव शेळके यांचे ते चिरंजीव होते. (स्व.