शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये व्यापाऱ्यावर हल्ला प्रकरण; स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना

By अण्णा नवथर | Updated: February 11, 2024 15:16 IST

Ahmednagar Crime News: अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरात शनिवारी रात्री एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली.

- अण्णा नवथर अहमदनगर - शहरातील गुलमोहर रोड परिसरात शनिवारी रात्री एका व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. धीरज मदनलाल जोशी (वय ५४,  रा. किर्लोस्कर कॉलनी गुलमोहर रोड )  असे हल्ला झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचे शहरातील रामचंद्र खुंट येथे बन्सी महाराज, या नावाने मिठाईचे दुकान आहे. 

असा आहे घटनाक्रमधीरज जोशी हे शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रामचंद्र खुंट येथील दुकान बंद करून घराकडे निघाले होते. ते कुठला डीएसपी चौक तारकपूर प्रोफेसर चौक, गुलमोहर रोड मार्गे किर्लोस्कर वसाहतीत आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या जवळच धाकटी मुलगी आदिती ही पाळीव कुत्र्याला फिरवत होती. तिला पाहून धीरज हे रस्त्यातच थांबले. त्यावेळी पाठीमागून दोन इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून आले. त्यांनी धीरज यांच्यासमोर मोटार सायकल थांबविली. मोटरसायकलवरून  उतरून ते दोघे धीरज यांच्या जवळ आले. तेव्हा मोटरसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाच्या हातात तलवार होती.  दुसऱ्याकडे काहीतरी टोकदार हत्यार असल्याचे धीरज यांना दिसले. ते दोघेही चालत धीरज यांच्या जवळ आले व शिवीगाळ करत एकाने तलवारीने वार केले. धीरज यांनी आडवा हात पुढे करून प्रतिकार केला. त्यामुळे त्यांच्या डाव्या हाताला गंभीर जखम झाली असून ते थोडक्यात बचावले.  

त्यानंतर काही क्षणातच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी धीरज यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेने शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्यासह मोठा फौज फाटा धीरज यांच्या राहत्या घरी पोहोचला. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. आमदार संग्राम जगताप यांनी धीरज यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी रुग्णालयावर नातेवाईकांचा मोठा जमाव जमला होता. या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले असून स्थानिक गुन्हे शाखा शाखेचे दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मोहीम सुरूधीरज जोशी यांचे रामचंद्र खुंटावर मिठाईचे दुकान आहे तेथून ते कुठला डीएसपी चौक तारकपूर मिस्कीन मळा तोफखाना पोलीस स्टेशन कुष्ठधाम रोड मार्गे गुलमोहर रोड वर आले तिथून ते त्यांच्या राहत्या घरी किर्लोस्कर वसाहतीत जात होते या मार्गावरील सीसीटीव्ही तोफखाना पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत आरोपी जोशी यांचा कुठून ते कुठपर्यंत पाठलाग करत होते याचा पोलिसांना शोध घ्यायचा आहे. घटनास्थळी पिस्टल व धारदार शस्त्रधीरज जोशी यांच्यावर हल्ला करून हल्लेखोर काही क्षणात घटनास्थळावरून पसार झाले पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यावेळी घटनास्थळी एक गावठी पिस्टल व धारदार काळ्या रंगाचे शस्त्र सापडले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर