अहमदनगरमध्ये भरदुपारी युनियन बँकेचे ११ लाख रुपये लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 17:22 IST2018-03-20T17:22:54+5:302018-03-20T17:22:58+5:30
शहरातील चांदणी चौकातून युनियन बँकेचे अकरा लाख रुपये लुटारूंनी लांबविले. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत कँप पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

अहमदनगरमध्ये भरदुपारी युनियन बँकेचे ११ लाख रुपये लुटले
ठळक मुद्देकारला दुचाकी आडवी घातली
अहमदनगर : शहरातील चांदणी चौकातून युनियन बँकेचे अकरा लाख रुपये लुटारूंनी लांबविले. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत कँप पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
बँक मॅनेजर व दोन कर्मचारी कारमधून पैसे घेऊन जात होते. कार चांदणी चौकातून जात असताना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कारला दुचाकी आडवी घातली. तात्काळ कारची काच फोडून पैसे दोघा चोरांनी लंपास केले. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. कँप पोलिसांकडून आरोपींची शोधमोहीम सुरू असून शहर व परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.