अहमदनगर विधानसभा निवडणूक निकाल :  राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 09:51 IST2019-10-24T09:50:26+5:302019-10-24T09:51:24+5:30

अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसºया फेरीनंतर आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे.

Ahmednagar Assembly Election Results: NCP's Sangh Jagtap leads | अहमदनगर विधानसभा निवडणूक निकाल :  राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर

अहमदनगर विधानसभा निवडणूक निकाल :  राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आघाडीवर

अहमदनगर : अहमदनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप दुसºया फेरीनंतर आघाडीवर आहेत. जगताप यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांच्याशी लढत आहे.
पोस्टल मतदानामध्येही संग्राम जगताप यांनीच आघाडी घेतली होती. आतापर्यंत मतदारसंघात दोन फेºया झाल्या. पहिल्या फेरीअखेरही आमदार जगताप हे ६४९ मतांनी आघाडीवर होते. दुसºया फेरीअखेर संग्राम जगताप यांना ८ हजार २४५ मते मिळाली, तर सेनेचे राठोड यांना ६ हजार ९४७ मते मिळाली. आमदार जगताप हे १ हजार २९८ मतांची आघाडी मिळाली.
 अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम याला ५७ मते मिळाली, एमआयएमचे असिफ सुलतान यांना ६२ मते मिळाली. भाकपचे बहिरनाथ वाकळे यांना ३६ मते मिळाली. मनसेचे संतोष वाकळे यांना ५१ मते मिळाली. 
मतमोजणी ही नागापूर-बोल्हेगाव या भागातून सुरू झाली आहे. त्यामुळे सावेडी उपनगराने जगताप यांच्या पारड्यात मते टाकली आहेत. दोन्ही फेरीत जगताप पुढे असून त्यांनी दुसºया फेरीत पहिल्या फेरीपेक्षा दुप्पट मतांनी आघाडी घेतली आहे.

Web Title: Ahmednagar Assembly Election Results: NCP's Sangh Jagtap leads